Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

म्युल अकाऊंट्स' वापरून सायबर फसवणूक करणाऱ्याला अटक कारसह 11.05 लाखांचे साहित्य जप्त : सांगली सायबर पोलीस ठाण्याची कारवाई,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती

म्युल अकाऊंट्स' वापरून सायबर फसवणूक करणाऱ्याला अटक कारसह 11.05 लाखांचे साहित्य जप्त : सांगली सायबर पोलीस ठाण्याची कारवाई,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती


विविध व्यक्तींची बँक खाती सायबर फसवणूकिसाठी भाड्याने किंवा कमिशनवर घेऊन त्यांमध्ये सायबर फसवणूकिचे पैसे जमा करून त्याचा वापर करणाऱ्या सांगलीतील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, सिम कार्डस, क्रेडिट, डेबिट कार्ड असा 11.05 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

जैब जावेद शेख (वय २२, रा. मीरा हौसिंग सोसायटी, ओंकार अपार्टमेंट प्लॅट नं.०६, टिंबर एरीया सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणूकिसाठी उघडण्यात आलेल्या "म्युल अकाऊंट्स" ची तपासणी करून ती खाती कमिशन/भाडयाने देणाऱ्या व्यक्ती व संघटीत टोळ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय हारूगडे, सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांना दिल्या होत्या. 

त्यानुसार शेख याने त्याचे साथीदारांच्या मदतीने सांगली व इतर ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक लोकांचे बँक खाते उघडून तसेच त्याकरीता आवश्यक सीमकार्ड मागवून त्यांचा वापर ऑनलाईन सायबर फसवणूकी करीता वापरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारूती कार (एमएच १४ जी.ए ६९३२), 34 डेबिट कार्ड, 27 सिम कार्ड, 6 मोबाईल, 17 पासबुक, संगणकीय साहित्य, विविध लोकांची नावे असलेले बैंक खाते संबंधिची साधन सामुग्री जप्त करण्यात आली.

सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय हारूगडे, सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रूपाली पवार, सलमा इनामदार, विवेक साळुंखे, अजय पाटील, अभिजित पाटील, विजय पाटणकर, इम्रान महालकरी, दिपाली नेटके, शांतव्वा कोळी, गणेश नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.