किणी येथील ट्रॅव्हल्स बसवरील दरोडा बारा तासात उघड सहा जणांना अटक : सांगलीच्या तिघांचा समावेश 60 किलो चांदी, दहा ग्रॅम सोने असा 1.22 कोटींचा मुद्देमाल जप्त
सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स मधील सुमारे एक कोटी 22 लाख रुपयांचे चांदी, सोने व इतर वस्तू असणारी बॅग धारदार शस्त्राची भीती दाखवून ६ जणांच्या टोळीने लंपास केली होती. यातील सहा संशयितांना अवघ्या बारा तासात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 60 किलो चांदी, दहा ग्रॅम सोने असा 1.22 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अक्षय कदम (रा. विक्रम नगर कोल्हापूर), जैन अफगाणी (रा. उचगाव कोल्हापूर), अमन सय्यद (रा. विक्रम नगर कोल्हापूर), सुजल चौगुले (रा. आकाशवाणी रोड सांगली), आदेश कांबळे (रा. आकाशवाणी रोड सांगली), आदिनाथ विपते (रा. आकाशवाणी रोड सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.बसमधील ऐवज लुटल्याच्या घटनेनंतर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर अमोल ठाकूर यांनी त्यांची टीम, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासोबत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ तपास करून सर्व सहा आरोपी ताब्यात घेतले. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.१२ तासांमध्ये गुन्ह्याची उकल करून सर्व आरोपी ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी टीमचे कौतुक केले आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, हिंदुराव केसरे, संजय कुंभार, रोहित मर्दने, वसंत पिंगळे, शुभम संकपाळ, युवराज पाटील, संदीप पाटील, शिवानंद मठपती, विशाल चौगुले, सचिन जाधव, अनिकेत मोरे, गजानन गुरव, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, राजेश राठोड, सुशील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.