महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या तिघांना अटक 3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेशी बोलण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3.40 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
अनिकेत ऊर्फ अजय राजू रजपूत (वय २५), राज हणमंत तुपे (वय २०), लक्ष्मण निळू व्हनखंडे (वय २३ वर्षे दोघेही रा. इंदीरानगर हौसींग सोसायटी, आंचा चौक, कुपवाड रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 15 डिसेंबर रोजी मणेराजुरी येथील उपळावी रोड येथे शेतात काम करणाऱ्या महिलेशी बोलण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केले होते. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते.पथकातील सागर टिंगरे यांना सांगलीतील यशवंतनगर येथे तिघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी मणेराजुरी येथील गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून 3.40 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांना तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर टिंगरे, सतिश माने, सागर लवटे, मच्छिन्द्र बर्डे, संदीप नलावडे, अमर नरळे, संदिप गुरव, सोमनाथ गुंडे, उदय माळी, महादेव नागणे, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.