सांगली: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरउद्यानाच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणीसंशयित गौस गोपी बोजगार (वय32, रा. गुरूवार पेठ, मिरज) यालाताब्यात घेऊन त्याच्याकडून गॅस सिलेंडर टाकी, वजनकाटा वरिफिलींगसाठी वापरली जाणारी मोटरअसा 20 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
डॉ. आंबेडकर उद्यानामागेअसलेल्या एका खोक्यात संशयित गौस बोजगार हा अवैधपणे गॅसरिफिलिंग करीत असल्याची माहितीपोलिसांना मिळाली. त्यानुसार तेथे कारवाई केली असता, संशयितबोजगार हा एका रिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करीत असताना पोलिसांनामिळून आला. संशयीताला ताब्यातघेऊन गुन्हा दाखल करण्यातआला. त्याच्याकडून गॅस टाक्याव रिफिलिंगचे साहित्य असा 20हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.