Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने अल्पसंख्याक अधिकार दिन साजरा

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने अल्पसंख्याक अधिकार दिन साजरा


गुरूवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने अल्पसंख्याक अधिकार दिन साजरा करण्यात आला. सभेचे अध्यक्ष मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांच्या हस्ते भ. महावीरांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करण्यात आले. केंद्रीय उपाध्यक्ष मा. डॉ. रावसाहेब जिनगोंडा पाटील व खजिनदार मा. श्री. बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य मा. डॉ.रावसाहेब पाटील यांनी अल्पसंख्याक दिनाचे महत्त्व, हक्क आणि अधिकाराविषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षितता लाभावी.ज्या ज्या देशात जो जो समाज अल्पसंख्यांक आहे, त्यांच रक्षण व्हावं, त्यांना योग्य ती वागणूक मिळावी, संविधानाने हा हक्क दिला असला तरी अल्पसंख्याक समाजाने कर्तव्याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. 

आपल्या देशात जैन, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, पारसी हे अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. अल्पसंख्यांकामध्येसुद्धा धार्मिक आणि भाषिक दोन्ही प्रकारचे अल्पसंख्याक समाज असतो. देशपातळीवर बघितले तर जसे हिंदू समाज काश्मिरमध्ये अल्पसंख्याक  आहे जैन समाजतर संपूर्ण देशात अल्पसंख्याक आहे.  सर्वच अल्पसंख्याक समाज गुण्यागोविंदाने रहावा यासाठीच हा दिन आजच्या दिवशी साजरा केला जातो. अल्पसंख्याक म्हणून ज्या लाभाच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.  

याप्रसंगी सर्वश्री सांगली विभागाचे महामंत्री प्रमोद पाटील, कर्मवीर आरोग्य अभियानाचे चेअरमन डॉ. देवपाल बरगाले, जैन महिला परिषदेच्या चेअरमन अनिता वि. पाटील, जैन महिला परिषदेची सेक्रेटरी सरिता चौगुले, श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रमच्या चेअरमन सुनिता चौगुले, सेक्रेटरी मंगल चव्हाण,सीईओ योगेश खोत उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.