Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊतांची थेट सर्वोच्च न्यायालयावर नाराजी; म्हणाले, "माणिकराव कोकाटेंबाबत ६ तासांत निर्णय आणि."

संजय राऊतांची थेट सर्वोच्च न्यायालयावर नाराजी; म्हणाले, "माणिकराव कोकाटेंबाबत ६ तासांत निर्णय आणि."


बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते ॲड. माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या प्रकरणात दोषी सिद्ध करण्याच्या प्रक्रियेस स्थगिती द्यावी यासाठी कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर सर्वोच्च न्यायायाने कोकाटेंना दिलासा देत ही स्थगिती दिली आहे. मात्र त्यांना कोणतेही अधिकारपद भूषवता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊतांनी याबद्दल भाष्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊतांनी सर्वोच्च न्यायालयावर दबाव असल्याने शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा निर्णय होत नसल्याचे राऊत म्हणाले आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतिच्या निवडणुकीच्या निकालात भाजपाला मिळालेलं यश अभूतपूर्व असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

भाजपा आणि महायुतीच्या नगरपालिका निवडणुकीतील विजयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मतदारांना पैसा दिला, पैसा पाण्यासारखा वाटला. त्यामुळे जेव्हा आज देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की अभूतपूर्व विजय मिळाला आहे, ही अभूतपूर्व पैसा वाटल्याची किमया आहे…. शिंदेंची शिवसेना खरी आहे, तर जाऊन अमित शाह यांचे पाय धुवून तीर्थ प्या. जी शिवसेना तुम्हाला अमित शाह यांनी दिली, त्या शिवसेनेचे पुण्य खूप मोठे आहे आणि ते पुण्य सध्या तुम्हाला मिळत आहे. पण निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालय अजूनही निर्णय देत नाही कारण सर्वोच्च न्यायालयावर दबाव आहे.” 

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात निकाल देण्यास होत असलेल्या उशीराबद्दल बोलताना राऊतांनी महत्त्वाचे भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात न्यायालयाने तत्परता दाखवत ६ तासांत निर्णय दिला. मात्र शिवसेनेच्या निकाल अद्यापही दिला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संजय राऊत म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय एक आमदार माणिकराव कोकाटेंवर सहा तासांत निर्णय देते, आणि ४० आमदार ज्यांनी पक्ष बदलला आहे, त्याबद्दल संविधान आणि कायद्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय अजूनही निर्णय देत नाही. आता तारीख कोणती आहे? तर ३१ जानेवारी, निवडणुकीच्या नंतर, म्हणजे ही निवडणूक देखील तुम्ही खाऊन टाकाल, असे संजय राऊत म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.