चीनमध्ये सध्या एक इसम अत्यंत चर्चेत आहे. या इसमाला लोक बेडुक राजकुमार किंवा फ्रॉग प्रिन्स असे संबोधित आहेत. असे नाव ठेवण्यामागे त्या इसमाच्या चेहऱ्याचा आकार कारणीभूत आहे. त्याचा चेहरा एखाद्या बेडकाप्रमाणे झाला आहे.
30 वर्षांपर्यंत काचेच्या फॅक्ट्रीत कमा केल्यावर त्याचा चेहरा असामान्य स्वरुपात बदलला आहे. काच तयार करण्याचे काम 30 वर्षांपर्यंत काम केल्यावर त्याचे गाल असामान्य स्वरुपात मोठे झाले आहेत. त्याच्यासोबत काम करणारे लोक त्याला 'मोठे तेंड असलेला भाऊ' अशी हाक मारतात. फुग्यासारखा चेहरा असलेल्या 48 वर्षीय या इसमाचे काम काचेच्या फॅक्ट्रीत पाइपद्वारे साच्यांमध्ये हवा भरणे होते. तोंडातून सातत्याने हवा भरल्यामुळे स्नायू तुटले आणि त्याचा चेहरा असा झाला आहे.
काच तयार करणाऱ्या या कारगिराचे गाल किंचित हवा भरल्यावरही फुग्याप्रमाणे फुगून जातात. असे 30 वर्षांच्या कामादरम्यान गालांवर पडणाऱ्या तणावामुळे ते बेडकाप्रमाणे नाट्यामय स्वरुपात बाहेर पडले आहेत. झांग नावाचा हा इसम दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांताच्या झोंगशानमध्ये एका काचेच्या फॅक्ट्रीत काम करतो. स्वत:च्या चेहऱ्यावर आलेलया अशा बदलामुळे तो चर्चेत आहे.दीर्घकाळापर्यंत फूक मारल्यामुळे झांगच्या चेहऱ्याचे स्नायू अजबप्रकारे विकसित झाले आहेत. ज्यामुळे फूक मारताना त्याचे गाल विचित्र रुपाने फुगतात. मध्य हुनान प्रांताच्या एका गावातून येणारे झांग मागील 30 वर्षांपासून ग्वांगडोंगमध्ये काच फॅक्ट्रीत काम करत आहेत. वर्कशॉपमध्ये उष्णतेमुळे झांग हे अनेकदा शर्टशिवायच काम करतात. मी अनेक वर्षांपूर्वी हे काम सुरू केले होते, तेव्हा माझा चेहरा सामान्य होता. वारंवार हवा भरल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील स्नायू खेचले गेले, हळूहळू माझे गाल सैल पडले आणि फुग्यांसारखे झाल्याचे झांग सांगतात.
काचनिर्मितीची कला चीनमध्ये 1000 वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास असलेली आहे. आधुनिक उद्योगात बहुतांश काचेच्या भांड्यांच्या उत्पादनामध्ये हवा भरण्यासाठी यंत्रांचा वापर केला जतो. परंतु जटिल उत्पादनांच्या निर्मितीसाठी पारंपरिक पद्धतीनेच हवा भरण्याची आवश्यकता असते. उत्तर चीनच्या शांक्सी प्रांताच्या किक्सियन काउंटीला देशाच्या काचेच्या भांड्यांची राजधानी म्हटले जाते. तेथे 35 हजार काच तयार करणारे कारागिर आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.