'8 हजार कोटींच्या ठेवी मोडल्या, काम दाखवा' अजित पवारांकडून पुन्हा भाजपवर निशाणा; 'मागच्या 9 वर्षातली अवस्था...'
केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेली राष्ट्रवादी पुणे-पिंपरी पालिकेत स्वतंत्र लढतेय. त्यामुळे दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतायत. अजित पवारांनी गेल्या 9 वर्षातील पुणे पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यानंतर युतीत काही अलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या. आता पुन्हा एकदा अजित पवारांनी युतीधर्मावर भाष्य केलंय.
काय नेमकं प्रकरण?
भाजपच्या सत्ताकाळात 8 हजार कोटींच्या ठेवी मोडल्या गेल्या. आता फक्त 2 हजार कोटींच्या ठेवी आहेत. ठेवी मोडल्या तर काम दाखवा ना, असे अजित पवार भाजपला उद्देशून म्हणाले. याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. आज मी इथे पाणी पीत असलो तरी निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे. कोणी आम्हाला विचारत असेल तुम्ही इथे काय केलं? तर त्यांनी प्रत्येकांनी आरशात पाहावं, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे, असे फडणवीस म्हणाले होते. यातून महायुतीत अंतर्गत वाद असल्याची चर्चा रंगली.
अजित पवार काय म्हणाले?
प्रभागातील चारही उमेदवारांनी नियमांचे पालन करा. ही पालिकेची निवडणूक आहे. देशात पंतप्रधानांच्या नेतृत्वात चांगल काम सुरु आहे. एनडीएला आपण सपोर्ट करतो. महापालिकेत मी 25 वर्षे काम केलय. कसा कायापालट झाला हे सर्वांनी पाहिलीय, असे अजित पवार म्हणाले. मागच्या 9 वर्षात पालिकेची अवस्था झाली. नियोजनशुन्यता, कर्जबाजारीपणा दिसला. गेली 25 वर्षे आम्ही पालिकेत नव्या गोष्टी करुन दाखवल्या. मेट्रोला मंजूरी दिली. पुणे-पिंपरीतही राष्ट्रवादीचा महापौर होता. बाकीच्या बाबतीत केंद्र, राज्याचा निधी आम्ही आणून देऊच, असे अजित पवार म्हणाले. इथल्या अडचणी दूर करण्यासाठी इथले उमेदवार दिलेयत. एकोप्याने काम करण्याचे आवाहन मी केलंय. उमेदवाराला सुरक्षा देण्याचे काम पोलिसांचे असल्याचे अजित पवार म्हणाले.मी महानगरपालिकेपुरतं बोलतोय. कशा पद्धतीने टेंडर पास होतात. ज्यांना काम द्यायचं त्यांच्या दृष्टीने सकारात्मक नियम आणले जातात. मी वक्तव्य केलं त्याला फुगवण्यात आलं. पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांनी त्यावर विधान केले. केंद्रात, राज्यात एनडीए आणि महाविकास आघाडीत होतो. मी पूर्ण भाजपला बोललो नाही. पालिकेतल्या गलथन कारभाराबद्दल बोललो. आताही त्यांच्याबद्दल बोलणार आहे. मी माझ्या परिने माझी भूमिका मांडतोय. ते मांडतील. आमच्यात अंतर कसं वाढेल असे प्रश्न विचारले जातायत, असे अजित पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.