उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सभानंतर वारे फिरणार सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूकीत दिवसेंदिवस रंग भरत असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सभांमुळे महापालिकेवर एकहाती भाजपाची सत्ता मिळविण्याचे भाजपा नेते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार, अशी क्यूब रचना आखली जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत अद्याप सामसूम असून कोण मोठा? कोण छोटा मातच नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे सांगली महापालिका सत्ता एका नव्या वळणावर आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या २० प्रभागातील ७८ उमेदवार निवडून देण्यासाठी गुरुवार दि.१५ जानेवारी मतदान होत असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीत सर्वच ७८ जागांवर भाजपाने उमेद्वार उभे केले आहेत. तर शिवसेना (शिंदे) ६५, राष्ट्रवादी (अजित पवार) ३३, काँग्रेस ३२, राष्ट्रवादी (शरद पवार) २२, शिवसेना (ठाकरे) ३२, समाजवादी पार्टी ५, मनसे ६ व अपक्ष १०९ असे ३८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गेल्या महापालिका निवडणूकीत भाजपाने ४१ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल काँग्रेसने २०, राष्ट्रवादी १५ व २ जागांवर अपक्ष विजयी झाले होते. भाजपाने एकहाथी सत्ता संपादन केली होती. पहिल्या अडिच वर्षात भाजपाचा महापौर होता, मात्र दुसन्या अडिच वर्षासाठी झालेल्या महापौर निवडणूकीत भाजपाचा उमेदवार पराभूत झाला आणि राष्ट्रचादीने महापौरपद जिंकले. मात्र सत्ताकेंद्र असलेले स्थायी समितीचे पद भाजपाकडेच होते.८ वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होत असून यादरम्यान, सांगलीचे राजकीय चित्र बदलले आहे. विशेषतः विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपाबासी झाले त्यामुळे भाजपात अनेक गट निर्माण झाले. आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. सुरेश खाडे, शेखर इनामदार, श्रीमती जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील आणि मुळचे जनसंघवादी कार्यकर्ते यांचे गट पडले आहेत. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणाला नाही. उलट आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी बासाठी एकमेकांनी कुरघोड्या केल्याचे चित्र दिसून येत असून त्यामुळे मतदार राजा मात्र नाराज झाला आहे.राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षांशी भाजपाने महापालिका निवडणूकीत युती केली नाही. उलट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्याबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रबादी (अजित पवार) पक्षाला एकही जागा न सोडता सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजपाला अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. तसेच भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज इच्छूक प्रचारापासून भाजपाने सामावून न घेतल्याने राष्ट्रबादी (अजित पवार) ३३ आणि शिवसेना (शिंदे) ६५ ठिकाणी आपले उमेदवार उमे केले. त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणार असल्याने भाजपाच्या अडचणीत आणखीन बाढ होणार आहे. तसेच निष्ठावंत विरुद्ध आयातराम यांच्यातील संघर्षही विकोपाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोर व अपक्ष किती मते घेतात यावरच भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
आज सांगलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भाजपाचा बालेकिला असलेल्या मारूती चौकात तर मिरजेत दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभा होणार असल्याने महापालिका क्षेत्रातील वारे फिरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बानिवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रबादी (शरद पवार) यांची आघाडी झाली असली तरी यापक्षाचे नेते जयंत पाटील आणि विश्वजित कदम बखा. विशाल पाटील हे प्रबारात उतरले आहेत. तसेच बादोन्ही पक्षांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी संधान साधून अजित पवार राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणखीन अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.