अपघातग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणाऱ्यांस २५ हजारांचे बक्षीस, सरकारकडून कॅशलेस उपचार मिळणार नितीन गडकरींचे सुतोवाच
मोटर वाहन कायद्यात रस्ता सुरक्षा, व्यवसाय सुगमता, नागरिक सेवा, उत्सर्जन नियम, आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतीवर भर देणाऱ्या ६१ दुरुस्त्यांचे प्रस्ताव केंद्र सरकार तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीत देण्यात आले.
बैठकीत २७ राज्यांचे परिवहन मंत्री, अधिकारी उपस्थित होते. वाहन अपघातग्रस्तांची कॅशलेस उपचार योजना तयार झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, देशभरातील रस्ते अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या नागरिकांना तात्काळ आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी केंद्र सरकारची कॅशलेस उपचार योजना लवकरच औपचारिकरीत्या सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.गडकरी यांनी सांगितले की, 'कॅशलेस ट्रीटमेंट ऑफ रोड एक्सीडेंट विक्टिम्स स्कीम, 2025' अंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस प्रति अपघाती व्यक्तीस दिड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार दिले जाणार आहेत. ही सुविधा अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत वैध राहणार आहे. अधिसूचनेनुसार, मोटार वाहनांच्या वापरामुळे देशातील कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. उपचारात होणाऱ्या विलंबामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.अपघातग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणाऱ्यांना २५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. जखमीला सात दिवसांच्या उपचारात दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च देणार. वाहन विमा नसलेल्यांना जखमींना रस्ते सुरक्षा निधीतून हा पैसा दिला जाईल. 'हिट-ॲण्ड-रन' गंभीर जखमींना साडेबारा हजारांवरून ५० हजार रुपये, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला २५ हजारांऐवजी दोन लाख रुपये भरपाई देणार आहेत. देशात २२ लाख वाहनचालकांची कमतरता वाहनचालक प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात एक हजार २१ केंद्रे सुरू करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.