कुसळंब (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्यातील जामगाव (आ.) शिवारात एका आलिशान कारमधून चालवण्यात येणारे फिरते गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात केंद्र उघडकीस आणून पोलिसांनी १८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत माढा तालुक्यातील बोगस डॉक्टराला रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवारी पहाटे ४:४० च्या सुमारास जामगाव शिवारातील वाणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पडीक शेतात अलिशान कार उभी होती. पोलिसांनी कारमधील दोन काळ्या सॅकची झडती घेतली असता हा प्रकार उघड झाला.
छाप्यात काय सापडले?
छाप्यात ३ लाख रुपयांची 'झोन केअर' चालू स्थितीतील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व प्रोब आढळले. त्यासोबतच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या 'मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल' या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठा (१४४ सीलबंद गोळ्या) सापडला. गर्भपातासाठी वापरलेल्या गोळ्यांची ५१ रिकामी पाकिटे आणि रक्त लागलेले क्युरेटेज (गर्भपात साहित्य) तिथे सापडले. रक्तस्त्राव थांबवण्याचे इंजेक्शन, सलाईन बाटल्या, ग्लोव्हज आदी वैद्यकीय साहित्य जप्त केले गेले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.