Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायाधीशाची मद्यधुंद अवस्थेत ट्रेनमध्ये लघुशंका; सुप्रीम कोर्ट म्हणालं..

न्यायाधीशाची मद्यधुंद अवस्थेत ट्रेनमध्ये लघुशंका; सुप्रीम कोर्ट म्हणालं..


सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलं आहे की न्यायाधीश पदावर असलेल्या माणसाने ट्रेनमध्ये लघुशंका करणं आणि महिलांशी हुज्जत घालणं हा प्रकार घृणास्पद आहे. न्यायाधीश पदावर असलेल्या व्यक्तीचं हे वर्तन घाणेरडं आहे. अशा प्रकारच्या माणसाला सेवेत राहण्याचा काहीही अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण लाज आणणारं आहे आणि न्यायाधीश पदावरच्या व्यक्तीचं वर्तन हे किळसवाणं आहे असंही मत नोंदवलं आहे.

न्यायाधीश संदीप मेहता काय म्हणाले?

ज्या बोगीमध्ये न्यायाधीशाने लघुशंका केली तिथे एक महिला उपस्थित होती. असं असूनही या माणसाने असं वर्तन कसं काय केलं? तुम्हाला वाटतं का की न्यायालय ही बाब सहज शांतपणे खपवून घेईल? असा सवाल मेहता यांनी केला.

सदर प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?
मध्य प्रदेशातील सिव्हिल जज या पदावर कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने २०१८ मध्ये मद्यपान करुन धिंगाणा घातला होता. तसंच लघुशंकाही केली होती. ज्यानंतर या व्यक्तीला न्यायालयीन सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. नशेत या न्यायाधीशाने सह प्रवासी, महिला आणि टीटी यांच्याशी गैरवर्तन केलं. महिलेकडे पाहून शिवीगाळ आणि अश्लील इशारे केले. तसंच सीटवरच लघुशंका केली. त्याच्यावर हा आरोपही आहे त्याने मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? असं म्हणत ओळखपत्र दाखवत सह प्रवाशांना धमकावलंही होतं. जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस मेहता यांच्या पीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. सुनावणीच्या वेळी प्रतिवादीच्या वकिलांनी सांगितलं की न्यायाधीश जेव्हा प्रसंग घडला तेव्हा नशेत नव्हते.

मध्य प्रदेशातील सिव्हिल जजवर हे आरोपही आहेत की त्याने महिला प्रवाशाच्या समोर अश्लील वर्तन केलं, तसंच लोकांना धमकावलं. या घटनेनंतर बराच हंगामा झाला होता. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या सिव्हिल जजची चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले. हे सगळं प्रकरण सुरुवातीला उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयाने शिक्षा दिली. तर राज्यपालांनी बडतर्फीचे आदेश दिले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं प्रकरण अत्यंत किळसवाणं असल्याचं म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.