Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा, मुस्लिम, दलित एक झाल्यास भाजपाला चिरडून टाकतील - मनोज जरांगे

मराठा, मुस्लिम, दलित एक झाल्यास भाजपाला चिरडून टाकतील - मनोज जरांगे


भाजपवाले फार कलाकार आहेत.त्यांनी पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेचा आणि अजितदादाचा काटा काढला. मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाल्यास ते भाजपला चिरडून टाकतील असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

परळीतील मिरवट येथे ते माध्यमांशी बोलत होते. जरांगे यांनी परळीतील मिरवट येथे आज शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशावर भाष्य करताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली. भाजपने बघायला काही ठेवलंच नाही. भाजपवाले मोठे कलाकार आहेत. अजितदादा पण असे लोक सांभाळत असल्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत. पापी लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजितदादांनी आतातरी समज घेतली पाहिजे. नासके लोक सोबत ठेवले म्हणून मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. भाजप जवळ करत नाही, यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं. दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. यामुळे महानगरपालिकेत केवळ मराठ्यामुळेच आपटावं लागलं. एमआयएमच्या यशाबद्दल बोलताना मुसलमान, दलित आणि मराठे एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच २०२९ च्या निवडणुकीत मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आले की, भाजपला ते चिरडून टाकतील असे ते म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.