Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत दोन तासात साडेसहा टक्के मतदान, मतदारांना केंद्र शोधताना अडचणी

सांगलीत दोन तासात साडेसहा टक्के मतदान, मतदारांना केंद्र शोधताना अडचणी


सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. पहिल्या दोन तासात ६.४५% मतदान झाले.

मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणी येत आहेत. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी एकूण ५२७ मतदान केंद्र असून, एकूण १ हजार १४३ ईव्हीएम यंत्र मतदानासाठी उपलब्ध आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, स्वच्छतागृहासह विविध सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

महापालिकेची निवडणूक तिरंगी, चौरंगी होत आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.