जळगावातील उमेदवाराला शून्य मतदान, 'माझं स्वत:चं मतदान कुठे गेलं'ची पोस्ट व्हायरल, ईव्हीएम मशीनबाबत संशय, नेमकं सत्य काय?
निवडणुकांमधील इव्हीम मशीनच्या मुद्यावरुन अनेकदा आरोप-प्रत्यारोप आणि शंका उपस्थित केली जाते. तर याच मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनचं वेळो वेळी देण्यात आलं आहे. असे असताना जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला पोस्टलमध्ये शून्य मतदान मिळाल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. सध्या या पोस्टची समाज माध्यमांवर चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, सुनंदा फेगडे यांना शून्य मतदान झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये दिसणाऱ्या यादीत सुनंदा भागवत फेगडे यांच्या नावासमोर शून्य मतं दिसत होती. त्यामुळे सुनंदा भागवत फेंगडे यांचे स्वत:चे मत कुठे गेले, असा सवाल निर्माण झाला होता. मात्र, आता या प्रकारातील नेमके सत्य समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मतांची आकडेवारी ही पोस्टल मतांची आहे. सुनंदा फेगडे यांना शून्य पोस्टल मतं मिळाली होती. तर ईव्हीएम मतदानात सुनंदा फेगडे यांना 92 मतं मिळाली.
खरंच EVM इतकी हुशार झालीय का? व्हायरल पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय?
'माझ्या घरातल्या लोकांचे मत जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत तर मी मला दिलं होतं, मग ते मत कुठे गेलं?'आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं? मत EVM मध्ये गेलं कि निकाल भाजपला गेला आणि प्रश्न विचारला की निवडणूक आयोग शांत. उत्तर मात्र भाजपकडून येतं! म्हणजे, EVM सरकारी, निवडणूक आयोग घटनात्मक, पण स्पष्टीकरण मात्र पक्षीय. आजची लोकशाही अशी झालीय की बटन मतदार दाबतो निकाल मशीन ठरवतं आणि खुलासा पक्ष देतो, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
EVM वर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवरच संशय घ्यायचा गुन्हा
मी मला मत दिलं होतं, ते मत दिसत नाही. पण आयोग म्हणतो EVM सुरक्षित आहे. भाजप म्हणतो जनतेचा कौल आहे. मग प्रश्न असा पडतो फेगडे बाईंचं मत अवैध होतं का? की मतदाराचाच कौल आता गरजेचा उरलाय नाही? आज EVM वर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवरच संशय घ्यायचा गुन्हा झाला असल्याचेही पोस्टमध्येम्हटलंआहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.