Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! मुंबईत ठाकरेंना झटका?, महायुतीचे वर्चस्व, तर पिंपरी-पुण्यात पवारांची चुरस

Breaking News! मुंबईत ठाकरेंना झटका?, महायुतीचे वर्चस्व, तर पिंपरी-पुण्यात पवारांची चुरस


महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या मोठ्या शहरांच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे 'एक्झिट पोल' समोर आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुती (भाजप-शिंदे गट-अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (ठाकरे गट-शरद पवार गट-काँग्रेस) यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

१. मुंबई महानगरपालिका : जनमत आणि रुद्र रिसर्चचा अंदाज

मुंबईत २२७ जागांसाठी झालेल्या या लढतीत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची मोठी चर्चा होती. मात्र, एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे.

जनमत एक्झिट पोल:

भाजप + शिवसेना (शिंदे गट): १३८ जागा (बहुमताचा आकडा पार)
शिवसेना (UBT) + मनसे + शरद पवार गट: ६२ जागा
काँग्रेस + वंचित: २० जागा
इतर: ७ जागा
रुद्र रिसर्च अंदाज:

भाजप + शिवसेना (शिंदे गट): १२१ जागा
शिवसेना (UBT) + मनसे: ७१ जागा
काँग्रेस + वंचित: २५ जागा
इतर: १० जागा
दोन्ही पोलनुसार मुंबई महापालिकेत २५ वर्षांपासून असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, महायुती मुंबईवर भगवा फडकवू शकते.

लोकशाही रुद्र रिसर्च एक्झिट पोल

लोकशाही आणि रुद्र रिसर्च यांच्याही एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.

भाजप शिवसेना - 121

शिवसेना ठाकरे- मनसे - 71

काँग्रेस वंचित - 25

इतर - 10

Axis My India BMC Exit Poll : अॅक्सिस माय इंडिया मुंबई एक्झिट पोल

भाजप शिंदे - 131- 151
ठाकरे- मनसे - 58-68
काँग्रेस-वंचित - 12-16
इतर - 6-12
मतदानाची टक्केवारी कशी?

भाजप शिंदे - 42
ठाकरे- मनसे - 32
काँग्रेस-वंचित - 13
इतर - 13
JDS BMC Exit Poll : जेडीएस मुंबई एक्झिट पोल

भाजप शिंदे - 127-154

ठाकरे- मनसे - 44-64

काँग्रेस-वंचित - 16-25

इतर - 09-17

2. कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार (साम टीव्ही अंदाज)

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार एमएमआर (MMR) क्षेत्रात संमिश्र कल पाहायला मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली :

येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली असून ५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ४२ जागा मिळतील. मनसे आणि ठाकरे गटाला प्रत्येकी २ ते ६ जागांवर समाधान मानावे लागेल.

वसई-विरार:

येथे वंचित बहुजन आघाडी ७२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. भाजपला २७ तर ठाकरे गटाला ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

3. पिंपरी-चिंचवड आणि पुणे (प्राब एक्झिट पोल)

पुणे जिल्ह्यात 'प्राब' (PRAB) या संस्थेने वर्तवलेला अंदाज अजित पवार आणि भाजपसाठी दिलासादायक आहे.

पिंपरी-चिंचवड:

अजित पवार गट : ५१ जागा
भाजप: २४ जागा
शिवसेना (शिंदे गट): ९ जागा
ठाकरे गट आणि शरद पवार गटाला येथे मोठा फटका बसताना दिसत असून, त्यांचे खाते उघडणेही कठीण असल्याचे चित्र आहे.

4) पुणे महानगरपालिका :

भाजप: ९३ जागा (मोठा विजय)
अजित पवार गट : ४३ जागा
शरद पवार गट: ८ जागा
काँग्रेस: ८ जागा
शिवसेना (UBT): ७ जागा
5. उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगरमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच चुरस पाहायला मिळत आहे.

शिवसेना (शिंदे गट): २९ जागा
भाजप: २८ जागा
शरद पवार गट: १५ जागा
इतर स्थानिक: १२ जागा
6) कोल्हापूरचा एक्झिट पोल

जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार, कोल्हापुरात भाजपला 29-32, शिवसेना शिंदे गटाला 18-21, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसला 19-23, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0-1, शिवसेना ठाकरे गटाला 3-4, मनसेला 0-1, तर इतरांना 2-4 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.