Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात 3 दिवस असणार आहे 'ड्राय डे', काय आहे कारण?

महाराष्ट्रात 3 दिवस असणार आहे 'ड्राय डे', काय आहे कारण?
 

मुंबई: येत्या रविवारी जर तुमचा मित्रांसोबत पार्टी करायचा काही प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रामध्ये तीन दिवस ड्राय डेची घोषणा केली आहे. राज्यामध्ये काही महत्त्वाच्या दिवशी ड्राय डे घोषित केला जातो. 15 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ड्राय डे असणार आहे. कोणकोणत्या पद्धतीने ड्राय डे असणार, एकदा जाणून घेऊया...

राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार, ड्राय डेच्या दिवसांमध्ये कुठेही दारू दिली किंवा विकली जात नाही. ही बंदी वाइन शॉप्स, बार, पब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना लागू होते. धार्मिक प्रसंग, राष्ट्रीय उत्सव आणि निवडणुकींच्या काळामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी ड्राय डे पाळला जातो आणि लागू केलेल्या संपूर्ण ठिकाणी हा दिवस सक्तीने पाळला जातो. महाशिवरात्र येत्या 15 फेब्रुवारीला आहे, या दिवशी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ड्राय डेची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यादिवशी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ड्राय डे असणार आहे. तर 23 फेब्रुवारीच्या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. समाज सुधारकांच्या जयंतीनिमित्त मुंबई आणि दिल्लीमध्ये ड्राय डे असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. ड्राय डेच्या दिवशी राज्यभरातील मद्यविक्रीची दुकानं, बार, परमिट रुम बंद राहतील. ड्राय डेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी असणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.