सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या" सांगली पॅटर्न" कामाची जागतिक पातळीवर दखल...
सांगलीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात "सांगली पॅटर्न"च्या माध्यमातून राबवलेल्या १५ उपक्रमांची आता जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. कामगार, शेतकरी, वंचीत, कष्टकरी, विद्यार्थी आदी घटकासाठी अशोक काकडे यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची नेचर युनायटेड किंगडम आणि सायन्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या संशोधन मासिकाने दखल घेतली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अशोक काकडे आता जगातले प्रयोगशील जिल्हाधिकारी ठरले आहेत. अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपल्या कामाच्या वेगळा ठसा सांगली जिल्ह्यात उमटवला आहे. खरतरी अत्यंत कौतुकास्पद असे हे काम जिल्हाधिकारी काकडे यांनी कोणताही गाजावाजा न करता अथवा प्रसिध्दीच्या मागे न लागता अत्यंत सचोटीने केले.त्यामुळेच या अनोख्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.
अशोक काकडे हे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी सांगलीत कार्यरत होते. त्यावेळी जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर या होत्या.म्हैसकर यांनी ही त्या काळात जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले. जिल्हाधिकारी काकडे हे नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी महिलांचे आरोग्य, वाचन संस्कृती, कॉपीमुक्त अभियान,हे अभियान राबविले.आणि त्यांचे हे अभियान एक पॅटर्न म्हणून राज्य सरकारने स्विकारले.आणि राज्यभर राबवले. पुण्यात सिडकोला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अशोक काकडे यांनी "गरिबासाठी घरे" हा प्रयोग राज्यासाठी विकसित केला.हा प्रयोग आजही लोकप्रिय आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका वर्षभरात अशोक काकडे यांनी आपल्या कामाची झलक दाखवली आहे. त्यांनी "सांगली पॅटर्न" च्या माध्यमातून अत्यंत अनोखे उपक्रम राबवून सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत आगळ्यावेगळ्या उत्साहाने ते नेहमी कार्यरत असतात. समोरच्या माणसाचं काम क्षणाचाही विलंब न लावता ते कसे मार्गी लागेल याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. अखंड ऊर्जा आणि सर्वसामान्याविषयी तळमळ असणारे अशोक काकडे हे कार्यक्षम जिल्हाधिकारी आहेत.असे कृतीशील अधिकारी क्वचितच लाभतात. खरेतर सांगली जिल्ह्याचे हे भाग्य आहे की, यापूर्वीच्याही अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. आता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही अत्यंत आगळ्यावेगळ्या कामातून सांगलीवर आपला वेगळा ठसा उमटवला. ही अत्यंत कौतुकास्पद अशी बाब आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी "सांगली पॅटर्न" च्या माध्यमातून जिल्ह्यात १५ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यात रिमांड होम व अनाथ आश्रमातील मुलांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी त्यांना स्किलिंगचे धडे दिले आणि स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी मदत केली तसेच एड्सग्रस्त मुलांसाठी त्यांनी राबवलेला अत्यंत संवेदनशील असा हा प्रयोग यशस्वी झाला आहे मुलांचे विवाह घडवून त्यांना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या या पॅटर्नमुळे घरची लक्ष्मी आता सातबारावर आली आहे. महिलांना मालकी हक्काची ओळख करून देणारा हा उपक्रम जिल्ह्यात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्याचबरोबर घरेलू कामगार महिलांसाठी विशेष आरोग्य मोहीम राबवून हजारो महिलांवर मोफत उपचर करण्याचे यशस्वी काम त्यांनी केले आहे. मुलींसठी कराटे व आत्मसंरक्षण प्रशिक्षण देऊन हजारो मुलींना आत्मनिर्भर केले आहे. अवयव दानाला चालना देण्याचे काम ही त्यांनी व्यापक प्रमाणात राबवले. कृषी क्षेत्रातही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले. "शेतातून माल थेट परदेशी बाजारपेठेत" हा उपक्रम खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला.
त्याचबरोबर पर्यावरण पूरक संकल्पनेची अंमलबजावणी त्यांनी प्रभावीपणे केली. "जिल्हाधिकारी यांचा दरवाजा उघडा" या लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना त्यांनी राबवली. मिरजेच्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. अशा अनेक आगळ्यावेगळ्या कामातून त्यांनी आपला ठसा उमटवला. आज त्यांच्या या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यभर हे उपक्रम राबवण्याबाबत प्रयत्न करावा ही अपेक्षा.... जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे मनापासून अभिनंदन....
प्रकाश कांबळे
पत्रकार, सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.