Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झरे येथील बँक लॉकरमधील चोरीप्रकरणी आणखी दोघांना अटक सांगली एलसीबीची उत्तरप्रदेशमध्ये धाडसी कारवाई

झरे येथील बँक लॉकरमधील चोरीप्रकरणी आणखी दोघांना अटक सांगली एलसीबीची उत्तरप्रदेशमध्ये धाडसी कारवाई
 

जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडून त्यातील दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक करण्यात आली उत्तरप्रदेश येथे जाऊन सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. असलम ऊर्फ टनटन मिडोरी खान (वय ६२, रा. ककलारा, ता. दातागंज, जि. बदायु, उत्तर प्रदेश), शकील अकबर कुरेशी (वय ५४, रा. इस्लामनगर, ता. पटीयाली, जि. कासगंज, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यापूर्वी राहुल रंजमीश शर्मा (वय २७, रा. गाव ककराला, ता. जि. बधायु, उत्तर प्रदेश), विश्वजीत विजय पाटील (वय २४, रा. बांबवडे, ता. पलुस, जि. सांगली), संकेत अरुण जाधव (वय २६, रा. बलवडी, ता. खानापुर, जि. सांगली), इजाज राजु आत्तार (वय ३०, रा. आमनापुर, ता. पलुस, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.

दि. 7 जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरने फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तातडीने तपास करून संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस तसेच एलसीबीला दिल्या होत्या. घटनास्थळावरील गॅस कटर बाबत सखोल तपास केल्यावर तो कटर पलूस येथून आणल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार तसेच तांत्रिक तपास केल्यावर पाटील, जाधव, आत्तार यांची नावे निष्पन्न झाली. 
 
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर विजय पाटील हा पूर्वी उत्तरप्रदेश येथे गलाईचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच उत्तरप्रदेश येथील शर्मा याच्यासह त्याच्या साथीदारांना चोरीसाठी बोलावून घेतल्याचे स्पष्ट झाले. तसेच उत्तरप्रदेश येथील काहीजण पलूस येथील लॉजवर राहिल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली होती. यात आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक संशयितांना पकडण्यासाठी उतरप्रदेश येथे पाठवले होते.
 

पूर्वी अटक केलेल्या चारही संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, एक गावठी कट्टा, चार काडतूसे, गॅस सिलिंडर, स्कॉर्पिओ (डी एल 10 सीएफ 9268) असा 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आता अटक केलेल्या खान आणि कुरेशी याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप नलावडे, सागर लवटे, संदीप गुरव, सागर टिंगरे, अतुल माने, सोमनाथ गुंडे, रणजित जाधव, सतिश माने, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, अमर नरळे, अरुण पाटील, अमिरशा फकीर, सुनिल जाधव, सुरज थोरात, विक्रम खोत, रोहन घरते, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.