कर्मवीर पतसंस्थेने १३०० कोटी ठेवीचा टप्पा केला पुर्ण चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांची माहिती
कर्मवीर पतसंस्थेने ठेवीदारांच्या हिताच्या ठेव योजना आणुन, कर्जदारांना त्यांच्या गरजेच्यावेळी कर्जपुरवठा करुन सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सभासदांच्या या विश्वासाच्या बळावर संस्थेने नुकताच रु. १३०० कोटी ठेवीचा महत्वपुर्ण टप्पा पुर्ण केला. यातून सभासदांचा संस्थेवरील विश्वास वृध्दींगत झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी आज माध्यमांना दिली. सभासद ठेवीदारांच्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करुन धन्यवाद दिले.
ठेवीदारांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करुन संस्थेने ठेवीदारांच्यासाठी विविध ठेव योजना जाहिर केल्या. त्यास ठेवीदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. मागील ३ महिन्यात संस्थेच्या ठेवीत अतिशय समाधानकारक वाढ नोंदविण्यात आली. तसेच माफक दराच्या कर्ज योजना मधुन संस्था सभासदाना हातभार लावत आहे. नजिकच्या काळात संस्था २ हजार कोटी ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या ठेवी ५६ कोटीने वाढल्या कर्जामध्ये ५४ कोटीची वाढ झाली आहे. भागभांडवल १४ कोटीने वाढले आहे, स्वनिधीमध्ये २२ कोटीने वाढ झाली आहे. सभासद संख्या १७०० ने वाढली आहे, अशी संस्थेने अनेक बाबीमध्ये समाधानकारक प्रगती केली आहे. मार्च २०२६ अखेर पर्यंत यामध्ये अजुन चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने सर्व संचालक व सेवक चांगले प्रयत्न करीत आहेत. सभासदांना बचतीची सवय लावून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे आणि गरजूंना कर्ज देवून त्यांना सक्षम करणे या मध्यवर्ती भूमिकेतून संस्था कार्य करीत आहे. सभासदांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत असे आवाहन करीत संस्था सामाजिक कार्यात ही मोलाचे योगदान देत आहे. यामुळे पतसंस्थेवरील सभासदांचा विश्वास वृध्दींगत झाला आहे असे मत व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम, संचालक डॉ. रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉ. अशोक आण्णा सकळे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, ओ. के. चौगुले (नाना), वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.