Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस महानिरीक्षकांना अटक होणार? पोलीस दलात खळबळ

पोलीस महानिरीक्षकांना अटक होणार? पोलीस दलात खळबळ


बिहारच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.


आंध्र प्रदेशमधील विशेष पथक आयपीएस अधिकारी एम. सुनील नायक यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. बिहारमधील शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्यी सरकारी निवासस्थानर सकाळी सकाळी पोलिसांचं पथक पोहोचलं. सुनील नायक हे सध्या बिहारच्या अग्नीशमन विभागाच्या पोलीस महानिरिक्षक पदावर नियुक्त आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संपूर्ण प्रकरण २०२१ सालातील आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागात होते. त्यांच्यावर एका माजी खासदारांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर आंध्र प्रदेशात नेण्याची तयारी सुरू आहे.

एम. सुनील नायक हे २०२१ साली आंध प्रदेश सीआयडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या आदेशानंतर तत्कालीन खासदार रघुराम कृष्णा राजू यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी रघुराम कृष्णा राजू कोर्टात गेले. त्यानंतर कोर्टात एम. सुनील नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

आयपीएस सुनील नायक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०७ अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला. माजी खासदाराने आरोप केला होता की, 'नायक यांनी कोठडीत जीवघेणा हल्ला केला. यामुळे मा‍झ्या जीवाला धोका धोका निर्माण झाला होता'. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

जामीन रद्द झाल्याने अटक होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नायक यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. परंतु त्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळण्यात आला. जामीन रद्द झाल्याने आंध्र प्रदेश पोलीस अलर्ट झाली. त्यानंतर पटनाच्या शास्त्री नगर येथील निवासस्थानी पोलीस पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.