Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूर :- धक्कादायक! सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य

नागपूर :- धक्कादायक! सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य
 

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोवरी गावात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सोळा वर्षीय सख्ख्या भावाने आपल्या बारा वर्षीय लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे दोघेही शिक्षण घेत असून, त्यांचे वडील कपडे शिवण्याचा व्यवसाय करतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही घटना उघड झाल्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. कुटुंबीयांना सुरुवातीला घटनेची कल्पना नव्हती. मात्र मुलीची प्रकृती बिघडल्याने तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले आणि संपूर्ण प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस स्टेशन यांनी तत्काळ दखल घेत आरोपी भावाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
 
या प्रकरणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बाल संरक्षण कायद्यांनुसार कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी मुलाने मोबाइलवरील अश्लील सामग्रीच्या प्रभावाखाली हा प्रकार केल्याची कबुली दिल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र निंदा होत असून कळमेश्वर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. मोबाईल व इंटरनेटच्या अनियंत्रित वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समाजात गंभीर चर्चा सुरू झाली आहे. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
अनियंत्रित मोबाईल वापर, समाजातील नैतिक अधःपतन...

या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील अनियंत्रित मोबाईल वापर, पालकांची देखरेख आणि समाजातील नैतिक अधःपतन यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गोवरी गावासह संपूर्ण कळमेश्वर तालुक्यात या घटनेची तीव्र निंदा होत असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने संवेदनशीलतेने प्रकरण हाताळून पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला आवश्यक वैद्यकीय व मानसिक समुपदेशनाची मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.