Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमेरिकेत प्राण गमावलेल्या भारतीय विद्यार्थिनीच्या पालकांना २६२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई

अमेरिकेत प्राण गमावलेल्या भारतीय विद्यार्थिनीच्या पालकांना २६२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई
 

अमेरिकेतील सिएटलमध्ये एका भारतीय विद्यार्थिनीला एक पोलीस अधिकार्‍याने कारने चिरडल्याची घटना घडली होती. २३ जानेवारी २०२३ रोजी घडलेल्या या घटनेत एका भरधाव पोलीस कारने पायी रस्ता ओलांडत असताना तरुणीला धडक दिली.या अपघातात त्या २३ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला होता. जान्हवी कंडुला  असं या विद्यार्थिनीचं नाव होतं. तर केविन डेव्ह हा पोलीस कर्मचारी त्यावेळी कार चालवत होता, या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सिएटल शहर प्रशासनाने त्या २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीच्या कुटुंबाला २९ दशलक्ष डॉलर्सची (सुमारे २६२ कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. केविन डेव्ह हा पोलीस अधिकारी चालवत असलेल्या कारने जान्हवीला धडक दिली होती. ही घटना घडली तेव्हा हा अधिकारी ड्रग ओव्हरडोस संबंधी फोन कॉलला प्रतिसाद देत असताना, २५ मैल प्रति तास (४० किलोमीटर प्रति तास) वेगमर्यादा असलेल्या भागात ७४ मैल प्रति तास (म्हणजे ११० किलोमीटर प्रति तास) वेगाने गाडी चालवत होता. तसेच त्याने वाहानाच्या एमर्जन्सी लाईट्स सुरू केलेल्या होत्या तसेच रस्त्यांच्या इंटरसेक्शनवर तो सायरनचा वापर देखील करत होता. 
“जान्हवी कंडुलाचा मृत्यू हा हृदद्रावक होता, आणि शहर प्रशासनाला आशा आहे की ही आर्थिक तडजोड कंडुला कुटुंबाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदतीची ठरेल,” असे सिटी अॅटर्नी एरिका एव्हान्स बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हणाल्या. “जान्हवी कंडुलाइचा जीव महत्त्वाचा होता. तो तिचे कुटुंब, तिचे मित्र आणि आमच्या समुदायासाठी तो महत्त्वाचा होता,” असेही निवेदनात म्हटले आहे. जान्हवी ही सिएटलमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत होती. जान्हवी कंडुलाच्या कुटुंबाच्या वकिलांनी अद्याप या संपूर्ण सेटलमेंटबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन्ही पक्षांनी किंग काऊंटी सुपिरियर कोर्टात गेल्या शुक्रवारी सेटलमेंट नोटीस दाखल केली आहे. स्थानिक न्यूज वेबसाईट पब्लिकोला ने यासंबंधीचे वृ्त्त दिले आहे.

जान्हवीच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच जागोजागी निदर्शने देखील करण्यात आली. या प्रकरणात दुसर्‍या एका पोलिसांच्या बॉडी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये संबंधित अधिकारी अपघातानंतर हसताना आणि विद्यार्थिनीचे जीवाची फार किंमत नसल्यासंबंधी बोलताना दिसून आले होते. यानंतर नागरिकांच्या संतापाचा आणखीच भडका उडाला होता. तसेच भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेच्या चौकशीची मागणी केली.
तसेच बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा आरोप ठेवत ५ हजार डॉलर्सचा अशी शिक्षा सुनावण्यात आला होता, त्या कार चालवणाऱ्या अधिकार्‍याला पोलीस विभागाने नोकरीवरून काढून टाकले. किंग काऊंटीच्या प्रोसिक्युटर्सनी त्याच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. किंग काऊंटीच्या सरकारी वकील अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यास नकार दिला. विद्यार्थिनीला धडक दिली तेव्हा त्या अधिकार्‍याने सुरक्षिततेबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केली हे आम्ही सिद्ध करू शकत नाहीत असे कारण त्यांनी दिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.