Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

Big Breaking! रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप


भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणी काही संपायच्या नाव घेत नाहीत. त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. आता त्यांच्याच पक्षातील रूपाली ठोंबरे यांनी गंभीर आरोप केला आहे. रूपाली पाटील चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. याप्रकरणात रूपाली चाकणकर यांना आरोपी करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

चाकणकर यांना मुख्य आरोपी करावे, असे थेट पत्र रूपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. ठोंबरे यांनी या पत्रात ३ महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेय. अशोक खरात हे काही केले आहे ते फक्त चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे केले आहे. त्यामुळे चाकणकर यांना आरोपी करण्यात यावे. लाडका भाऊ असा उल्लेख करत रुपाली पाटील यांची मुख्यमंत्र्यांना कारवाईची विनंती केली आहे. खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करु शकला, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. रूपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र खालील प्रमाणे आहे...

विषय - रुपाली निलेश चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स किट मध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करणे बाबत.

महोदय,

प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन बरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करु शकला आहे. रुपानी चाकणकर पानी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकुन अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. न्यावाचत मी आपणास म्वतंत्र माहिती देईल, तमेव भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्याम पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपानी निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मना माहित असून त्यातील अनेक गोष्टीचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्त्व्याचा बाबी खालीलप्रमाणे

१) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे मदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.

२) दि.२९/१२/२०२५ रोजी नाजिक ग्रामीण बाबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क. ४६८/२०२५ हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कैप्टन खरात याचा पेंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ती व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून मंदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.

३) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कैप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली वाकणकर पांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.