भोंदू खरातचा एन्काऊंटर होणार आहे, असा खळबळजनक दावा विरोधकांनी केलयं.. त्यामुळे खरातच्या पेनड्राईव्हत कोणतं गुपित दडलंय?...
पेऩड्राईव्हमुळे गोत्यात येणारे 3 मंत्री नेमके कोण? पाहूयात
विकृत अशोक खरात.. खरातचं प्रकरण आता फक्त नरबळी, लैंगिक शोषण, बेनामी मालमत्ता एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर दररोज वासनांध खरातचे एकेक कारनामे बाहेर येत आहेत. मात्र राजकारणी आणि प्रशासनाच्या वरदहस्ताशिवाय हे शक्यच नव्हतं. अनेक राजकीय व्यक्तींसोबत त्याचे संबंध असल्याचं समोर आलं आहे. यावरूनच विरोधकांनी हे पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काऊंटर होईल, असा खळबळजनक दावा केलाय... दुसरीकडे नाना पटोलेंनी 7 मार्चला खरात पुण्यातील एका मंत्र्यांच्या घरी होता, असा आरोप केलाय तर खरात भक्तांना निवडणुकीत भाजपला मतदान करण्यासाठी दबाव आणायचा, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय...आता खरात प्रकरणावर विरोधकांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका या प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित करतेय.. याप्रकरणाचे धागेदोरे प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंतही पोहचलेत...आतापर्यंत तपास यंत्रणांनी खरातकडून लॅपटॉप आणि कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे... मात्र खरातसह मंत्र्यांचे कारनामे उघड करणारा पेनड्राईव्ह अद्याप समोर आलेला नाहीय... त्यामुळे त्या पेनड्राईव्हमधून खरचं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह मंत्र्य़ांची नावं समोर येतील का? भोंदू खरातचे मंत्रिमंडळातील भक्तगण नेमके कोण आहेत? अनेक वर्षांपासून अंधश्रद्धेची विषवल्ली पेरणाऱ्या या खरातवर नेमकं कोणाचा वरदहस्त आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.