Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली व मिरज शहरातील दहा सार्वजनिक ठिकाणी महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार:, अतुल माने

सांगली व मिरज शहरातील दहा सार्वजनिक ठिकाणी महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार:, अतुल माने 


सांगली व मिरज शहरातील दहा सार्वजनिक ठिकाणी महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहेत. यासाठी 87 लाख 50 हजारांची निविदा मागविण्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. 10 ठिकाणी 50 सिट्स उभारण्यात येणार असून महिलांसाठी 25 सिट्स असतील.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनपा क्षेत्रात सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी शौचालयासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 100 सिट्स मंजूर करण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात शौचालयासाठी 42 लाखांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. प्रति सिट्साठी मपनाला 1 लाख 75 हजार रूपये खर्च येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रति सिट्स शौचालयासाठी 49 हजार 500, राज्य शासनाकडून 55 हजार 500 असे एकूण 1 लाख 5 हजार रूपये मिळणार आहे. तर मनपाला 70 हजार रूपये आपला हिस्सा घालावा लागणार आहे.

महापालिकेने 100 सिट्ससाठी 1 कोटी 63 लाख 168 इतकी हिस्साच्या रक्कमेची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात 50 सिट्ससाठी 87 लाख 50 हजार रूपयांची निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. सांगली शहरातील पाच ठिकाणी, मिरज शहरातील दोन ठिकाणी तर कुपवाड शहरात एका ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत. एकूण 50 सिट्स आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 25 तर पुरूषांसाठी 25 सिट्स असणार आहेत.

चौकट
या ठिकाणी होणार शौचालय
ठिकाण सिट्स
स्वामी समर्थ घाट, सांगली 6
शिवाजी मंडई, सांगली 8
रमाईमाता उद्यान, सांगली 6
शिवाजी स्टेडियम, सांगली 6
आमराई, सांगली 6
कुपवाड बस स्टँड 6
डॉ. आंबेडकर उद्यान, मिरज 6
शिवाजी स्टेडियम, मिरज 6

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.