सांगलीः सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणांविरोधात आक्रमक भूमिका घेत वारणाली झेड.पी. कॉलनी परिसरात मोठी कारवाई केली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या साहाय्याने रस्ता व सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या मोहिमेत कॉलनीच्या दोन्ही बाजूंवरील 7 कंपाउंडच्या भिंती, 2 तारेची कुंपणे, 4 दुकानांवरील लोखंडी व सिमेंट छपरे, एक बांधीव खोली तसेच इमारतीची अनधिकृत वाढीव भिंत जमीनदोस्त करण्यात आली.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या थेट आदेशानुसार, आज विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 मधील वारणाली झेड.पी. कॉलनी परिसरात जे.सी.बी. यंत्रांच्या साहाय्याने मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्ता आणि सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी सर्व बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.अतिक्रमण विभागाचे अधीक्षक नागार्जुन मद्रासी, विभागाचे अभियंता शाबाज शेख, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह विविध विभागांचे पथक या मोहिमेत सहभागी होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा पथकाचीही तैनाती करण्यात आली होती. महापालिकेने या कारवाईद्वारे अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा दिला आहे. शहराच्या नियोजनात अडथळा आणणार्या आणि रस्ते अडवणार्या अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा अधिक कडक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.