Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!


नसरापूर: गारांसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पुणे- सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री (ता. भोर) येथे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. तासाभरात पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावर हरिश्चंद्री फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्यामुळे सातारा बाजूकडून येणारी वाहतूक पुण्याकडे जाण्यासाठी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. दोन्ही बाजूकडून उतार असलेल्या या रस्त्यावर आज दुपारी चारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी तुंबले.
तेथील पाणी वाहून जाण्यासाठी बंद गटाराची योजना केली आहे. परंतु त्यामध्ये पाणी जाण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे पाणी तुंबून राहिले. शेवटी वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कामावरील यंत्रसामग्री घेऊन, उंच असलेले चेंबर फोडले. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रात्रीचे आठ वाजले होते.
या दरम्यान, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हरिश्चंद्रीचे नागरीक विकास गाडे यांनी सांगितले, की अभियंत्यांनी व ठेकेदारांनी पाण्याचा निचरा होण्याबाबत अगोदरच नियोजन करणे गरजेचे होते. कामाचे ठेकेदार निखिल कंस्ट्रक्शन ग्रुपचे सुनील सुरवसे म्हणाले, की अचानक आलेल्या पावसाने माती वाहून आली. त्यामुळे पाणी वाहणारे पाईप तुंबल्याने पाणी साचून राहिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.