Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत मनसेचे 'जवाब दो' आंदोलन; बेकायदेशीर बांधकामांवर १५ दिवसांत कारवाईची मागणी:, तानाजी सावंत

सांगलीत मनसेचे 'जवाब दो' आंदोलन; बेकायदेशीर बांधकामांवर १५ दिवसांत कारवाईची मागणी:, तानाजी सावंत 

सांगली : शहरातील मोठे मॉल, रुग्णालये व व्यावसायिक इमारतींना नगर रचना कार्यालयातून बेकायदेशीरपणे बांधकाम परवाने दिल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज "जवाब दो आंदोलन" करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून आयुक्तांनी १५ दिवसांच्या आत कारवाई करावी, अन्यथा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला.

यावेळी आर सिटी मॉल, पीएनजी ज्वेलर्स, कृष्णा हॉटेल, काळी खण, आयुक्तांचा बंगला, माळीज गोविंद आयकॉन तसेच शहरातील काही मोठी हॉस्पिटल्स व व्यावसायिक संकुलांना नगर रचना विभागाकडून बेकायदेशीरपणे बांधकाम परवाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

"आयुक्त खरोखर स्वच्छ असतील तर त्यांनी या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी.

१५ दिवसांत ठोस कारवाई झाली तर आम्ही श्रीमंत-गरीब असा भेदभाव होत नाही असे समजून त्यांचा जाहीर सत्कार करून समर्थन करू. अन्यथा त्यांना 'फाळकूट दादा' समजून मनसेच्या शैलीत सत्कार करू," असा इशाराही सावंत यांनी दिला.

आजचे आंदोलन हे केवळ इशारा व तक्रार आंदोलन असल्याचे सांगत, प्रशासनाने दखल न घेतल्यास उद्या मनसेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात मनसे सैनिक तसेच काही स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.