व्हॉट्सॲप After Reading नावाचे एक नवीन सुरक्षा फीचर आणत आहे, ज्यामुळे पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचल्यानंतर ठराविक वेळेत आपोआप डिलीट होईल. हे फीचर युझर्सची प्रायव्हसी, चॅटची सुरक्षितता वाढवण्यासाठी डिझाइन केले.
मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच घेऊन येत आहे. अनेकदा आपण पाठवलेले मेसेज चॅटमध्ये तसेच राहतात, ज्यामुळे डेटा चोरीची किंवा गोपनीय माहिती उघड होण्याची भीती असते. हीच समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्सॲप आता 'After Reading' हे धडाकेबाज फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
हे फीचर सुरू केल्यानंतर, तुम्ही पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला की, तो ठराविक वेळेत आपोआप डिलीट होईल. यामुळे तुमचं चॅट अधिक खाजगी आणि सुरक्षित राहणार आहे. विशेष म्हणजे, मेसेज किती वेळात डिलीट व्हावा, याचे नियंत्रण पाठवणाऱ्याकडे असेल.
१५ मिनिटांचा टायमर: जर समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला (Read), तर तो केवळ १५ मिनिटांत आपोआप गायब होईल.वाचला नाही तर काय?: जर समोरच्या व्यक्तीने मेसेज ओपन केला नाही, तरीही तो २४ तासांनंतर स्वतःहून डिलीट होईल.लहान टायमरचा पर्याय: सध्या व्हॉट्सॲपवर २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसांचे पर्याय आहेत. मात्र, नव्या अपडेटमध्ये १ तास ते १२ तासांपर्यंतचे छोटे टायमर सेट करण्याची सुविधा मिळणार आहे.हे फीचर विशेषतः संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी वरदान ठरेल.१. बँक डिटेल्स किंवा OTP पाठवण्यासाठी.२. ऑफिसमधील अत्यंत गोपनीय कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी.३. खाजगी संवाद सुरक्षित ठेवण्यासाठी.सध्या हे फीचर 'डेव्हलपमेंट स्टेज'मध्ये असून अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनवर याची चाचणी (Testing) सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच हे अपडेट जगभरातील सर्व युझर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.