मंत्रालयात खळबळनक घडामोड घडली आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनात प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. एकावेळी 25 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रलायातून IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा GR निघाला आहे. मंत्रायलातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बदलीचे आदेश मिळाल्यापासून तात्काळ या अधिकाऱ्यांना नवीन पदाचा पदभार स्विकारावा लागणार आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बदली झालेल्या 25 अधिकाऱ्यांची यादी
1. श्रीकांत (IAS:RR:2009), आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांची 'जल जीवन मिशन', नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. दिलीप स्वामी (IAS:SCS:2011), जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ', अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. वर्षा ठाकूर-घुगे (IAS:SCS:2011), जिल्हाधिकारी, लातूर यांची 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ', मुंबई येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. दीपक सिंगला (IAS:RR:2012), अतिरिक्त आयुक्त, PMRDA, पुणे यांची 'MGNREGS', महाराष्ट्र, नागपूर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. के. मंजुलेक्ष्मी (IAS:RR:2013), आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांची PMRDA, पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. डॉ. राजेंद्र भारूड (IAS:RR:2013), प्रकल्प संचालक (RUSA), उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांची आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. प्रवीणकुमार देवरे (IAS:SCS:2013), आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे यांची बुलढाणा येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. डॉ. भारत बास्तेवाड (IAS:SCS:2013), आयुक्त, MGNREGS, महाराष्ट्र, नागपूर यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. वर्षा लड्डा (IAS:RR:2013), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांची आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अमोल येडगे (IAS:RR:2014), जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 11. डॉ. विजय राठोड (IAS:RR:2014), सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12.विनय गौडा जी.सी. (IAS:RR:2015), जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. डॉ. किरण पाटील (IAS:NON-SCS:2015), जिल्हाधिकारी, बुलढाणा यांची पशुसंवर्धन आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. डॉ. मंगेश गोंदवले (IAS:Non-SCS:2015), व्यवस्थापकीय संचालक, MAIDC, मुंबई यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. कुमार आशीर्वाद (IAS:RR:2016), जिल्हाधिकारी, सोलापूर यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. वसुमाना पंत (IAS:RR:2017), अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
17. प्रजित नायर (IAS:RR:2017), जिल्हाधिकारी, गोंदिया यांची अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. अंकित (IAS:RR:2019), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांची अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. कार्तिकयेन एस. (IAS:RR:2020), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20.संजिता मोहपात्रा (IAS:RR:2020), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
21. मिन्नू पी एम (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
22. सत्यम गांधी (IAS:RR:2021) महापालिका आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
23. जास्मिन (IAS:RR:2022) सहायक जिल्हाधिकारी, राजापूर उपविभाग, रत्नागिरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
24. अंजली शर्मा (IAS:SCS:2022) यांची महापालिका आयुक्त, जालना महानगरपालिका, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
25. कृष्णकांत कंवारिया (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, शहादा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.