Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सांगलीतील धक्कादायक घटना

Big Breaking! शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सांगलीतील धक्कादायक घटना


सांगली : शिक्षणाच्या निमित्ताने पर जिल्ह्यातून सांगलीत येत असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्राचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रशांत रामचंद्र शिंगाडे (रा.चोरोची, ता. कवठेमहांकाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत येत-जात होती. संशयित प्रशांत शिंगाडेने तिच्याशी ओळख करून घेतली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने तिला लग्राचे आमिष दाखवले.
त्यानंतर दि. १३ ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी ही शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतरगर्भवती असल्याचे समोर आले. तिची प्राथमिक चौकशी केल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आपल्या बाबतीत जे काही घडले, याची माहिती पीडितने पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा (पॉक्सो) कायद्यातील तरतुदीनुसार संशयित प्रशांत शिंगाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि सदरचा प्रकार हा सांगलीत घडला असल्याने गुन्हा तपासासाठी सांगलीकडे वर्ग केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.