Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-"अजितदादांनंतर पक्षात पोकळी"; सांगली राष्ट्रवादीत राजीनाम्यांचे सत्र, ३५ नेत्यांचा पक्षाला 'रामराम'.

सांगली :-"अजितदादांनंतर पक्षात पोकळी"; सांगली राष्ट्रवादीत राजीनाम्यांचे सत्र, ३५ नेत्यांचा पक्षाला 'रामराम'.


सांगली : सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार ) पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. स्वीकृत निवडीवरून झालेल्या वादामुळे पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. महापालिकेचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांनी पक्षाचा आदेश डावलला. तसेच, पक्षाच्या संबंधित नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक पद बहाल केले, असा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी केला आहे. 

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे  (अजित पवार)  १६ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, स्वीकृत पदासाठी दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता. परंतु, राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते मैनुद्दिन बागवान यांनी एकाचा पत्ता कट करून अशोक मासाळे यांचे नाव घुसवलं. त्यावरून वाद निर्माण झाला असून ३५ पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. मैनुद्दिन बागवान यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.


याबाबत बोलताना पद्माकर जगदाळे म्हणाले, "१७ तारखेला स्वीकृत नगरसेवकासाठी सभा झाली. वरिष्ठांशी चर्चा करून स्वीकृतसाठी दोन नावे ठरवण्यात आली होती. त्याप्रमाणे स्नेहल सावंत आणि दिगंबर जाधव यांच्या नावाचे पाकीट मला प्रदेशकडून प्राप्त झाले होते. प्रदेशकडून आलेली नावे गटनेत्याने देणे कायद्याने बंधनकार आहे. असे असताना सुद्धा त्या पत्रावरील एक नाव बदलण्यात आले. अजित पवारांचा मृत्यू होऊन अडीच महिने झाले आहेत. आता आपल्याला धाकच कुणाचा राहिलेला नाही, मालकच कुणी राहिलेले नाही, अशा अविर्भावात काही लोक वागत आहेत. आज अजित पवार असते, तर असे झाले नसते."

"अजित पवारांच्या मृत्यूची तुम्ही संधी म्हणून घेण्यात आली आहे. निषेध म्हणून शहर जिल्ह्यातील ३५ लोकांनी राजीनामे माझ्याकडे दिले आहेत. पक्षाने गटनेत्यावर कारवाई केली पाहिजे. अशोक मासाळे हे आमच्या पक्षात नाहीत, तरीसुद्धा अचानक का स्वीकृत पद देण्याच आले हे कळायला मार्ग नाही," असे पद्माकर जगदाळे यांनी म्हटलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.