Big Breaking! नराधमाचे लाड! १८० मुलींच्या शोषकासोबत पोलिसांचे 'सेलिब्रेशन'; खाकीची मान शरमेने झुकली.
अमरावतीमधील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात फटाके फोडून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या या आरोपीला खुद्द पोलिसांनीच केक भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे परतवाडा प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हयगय केल्याचा आरोप होत असतानाच, दुसरीकडे चक्क पोलीसच आरोपीचे लाड पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावतीच्या परतवाडा येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणातील हा संतापजनक व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे. मुख्य आरोपी अयान अहमदने भररस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापला. यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट आरोपी अयानला केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी आरोपीने घातलेल्या टी-शर्टवर "BOSS" असे लिहिले होते.
ज्या दिवशी अयानने भररस्त्यात हा गोंधळ घातला, तेव्हा पोलिसांनी त्याला रोखण्याऐवजी तिथे उपस्थित राहून शुभेच्छा का दिल्या? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या पोलिसांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. अयान अहमद याने अनेक मुलींचे लैगिंक शोषण केले, त्याचे व्हिडिओही काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.परतवाडा येथील महिला आणि मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. अमरावती शहरातील ज्या फ्लॅटवर अयान अहमदने मुलींचे लैंगिक शोषण केले, तो फ्लॅट पोलिसांनी सील केला आहे. तपासासाठी आरोपीला त्या ठिकाणी नेले जाण्याची शक्यता आहे. कठोरा नाका परिसरातील संबंधित फ्लॅट मालकाची पोलीस चौकशी करणार आहेत. यात मालकाचा दोष आढळल्यास त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले जाईल. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ८ पीडितांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात अजून काही पीडित आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.