विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 12 मे रोजी मतदान होणार आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फक्त एक उमेदवार विजयी होऊ शकतो. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमधून निवृत्त झाले आहेत. तेच आघाडीचे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र, पुन्हा विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी उद्धव ठाकरे उत्सुक नसल्याची माहिती आहे. ते निवडणूक न लढण्यावर ठाम असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या ऐवजी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेचे संख्याबळ पाहाता ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, ठाकरेंच्या भूमिकेनंतर काँग्रेस काय भूमिका घेते याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेमधून 9 जण निवृत्त झाले आहेत.त्यातील भाजपच्या वाट्याला सहा, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस एक तर, शिंदेंच्या शिवसेनेचे एक असे आठ जण सहज विजयी होऊ शकतात. महाविकास आघाडीकडे 46 जणांचे संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचा देखील एक उमेदवार निवडणूक येऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेला पाठींबा
शरद पवार यांनी ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे कोणते नाव येईल, त्याला आमचा पाठींबा असेल असे जाहीर केले होते. तर, काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठींबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. भाजपकडून माथाडी नेत्याला मिळणार विधान परिषदेवर संधी?; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला 'हा' शब्द!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.