Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्तेची मस्ती? भाजप आमदाराच्या मुलाने ५ जणांना उडवले; प्रत्यक्षदर्शींनाही दाखवला धाक.

सत्तेची मस्ती? भाजप आमदाराच्या मुलाने ५ जणांना उडवले; प्रत्यक्षदर्शींनाही दाखवला धाक


मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाजप आमदाराच्या मुलाने भरधाव एसयूव्हीने ५ जणांना उडवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणाऱ्यांनाही त्याने धमकावल्याचे बोलले जात आहे. प्रीतम सिंह लोधी हे पिछोरे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा मुलगा दिनेश लोधी याच्यावर या अपघाताप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मजुरांना आणि रस्त्यावरून चालणाऱ्या दोन महिलांना धडक दिली. दिनेश लोधी याच्या अलिशान गाडीने ५ दुचाकीला आणि रस्त्याने चालणार्‍यांना जोरात धडक दिली. दिनेश लोधी याच्या गाडीच्या धडकेत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
दिनेश लोधी याच्या गाडीच्या धडकेत संजय परिहार, आशिष परिहार, अंशुल परिहार, सीता वर्मा आणि पूजा सोनी हे ५ जण जखमी झाले आहेत. लोथी यांच्याविरोधात संजय परिहार यांनी पोलिसांत तक्रार दिली. ते म्हणाले की, आशिष आणि अंशुलसोबत ते कामासाठी दुचाकीवरून थानरा गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून चालणाऱ्या दोन महिलांना आणि त्यांच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या अलिशान थारने जोराची धडक दिली. पोलिसांनी दिनेश लोधी याच्यावर विविध कलमांअतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपस पोलिसांकडून सुरु आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.