Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"देशात निवडणुकांचे वारे, तर मणिपूरमध्ये इस्रायलचे मोठे ऑपरेशन; ५००० 'बने मेनाशे' समुदायाचे स्थलांतर"

​"देशात निवडणुकांचे वारे, तर मणिपूरमध्ये इस्रायलचे मोठे ऑपरेशन; ५००० 'बने मेनाशे' समुदायाचे स्थलांतर"


पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न असताना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक घडामोड मणिपूरमध्ये घडली आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने मोठी मोहीम आखत मणिपूरमधून तब्बल पाच हजारांवर बने मेनाशे समुदायाच्या लोकांना उचलण्याची योजना सुरू केली असून, 250 जणांची पहिली तुकडी तेल अवीवला पोहचलीही आहे.

इतर देशाकडून सरळसरळ घुसखोरी होत असताना मोदी सरकारला याची साधी कानोकान खबरही नाही. आखातामध्ये इराणबरोबर युद्ध सुरू असतानाच इस्रायलने 4000 कि.मी. दूर ईशान्य हिंदुस्थानात ही मोहीम सुरू केली आहे. 'ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन' असे नाव या मोहिमेला दिले असून, याची सुत्रे मोसादच्या हातात आहेत. 2030 पर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी मणिपूरमधून बने मेनाशे जमातीचे 1200 लोक इस्रायलला स्थलांतरीत करण्यात येतील.

मणिपुरातील हिंसाचाराचा परिणाम आहे का?

मणिपुरमध्ये तीन वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. 3 मे 2023 रोजी कुकी आणि मैतेई समुदायामध्ये सुरू झालेला हिंसाचार, जाळपोळ, मृत्यूसत्र थांबविण्यास मोदी सरकारला अपयश आले आहे. या हिंसाचारामुळे बने मेनाशे लोक इस्रायलला स्थलांतर करत आहेत का? इस्त्र्ाायलकडून हिंसाचाराच्या आडून थेट मणिपूरमध्ये घुसखोरी सुरू आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

बने मेनाशेचा इतिहास
बायबलमध्ये उल्लेखलेल्या प्राचीन इस्रायलच्या 12 जमातींपैकी एक अशी बने मेनाशे जमात मानली जाते. ते स्वतःला बायबलमधील हरवलेल्या जमातींपैकी एक मानतात. ऐतिहासिकदृष्टय़ा इ. स. पूर्व 722 मध्ये अस्सीरियन शासकांनी या जमातीला हद्दपार केले होते. त्यानंतर शतकानुशतके सुमारे 10,000 लोकांनी पर्शिया, अफगाणिस्तान, तिबेट आणि चीनमधून प्रवास करत ईशान्य भारतात पोहोचून मणिपूर आणि मिझोराममध्ये वस्ती केली.

250 लोक दिल्लीमार्गे तेल अवीवला पोहचले

धक्कादायक म्हणजे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ पश्चिम बंगालमध्ये प्रचारात मग्न असतानाच गुरुवारी बने मेनाशे जमातीच्या 250 जणांची तुकडी इस्रायलची राजधानी तेल अवीवला पोहोचली. विशेष म्हणजे हे लोक दिल्लीमार्गे गेले. सरकार आणि त्यांच्या यंत्रणेला याची माहिती कशी नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कुकी जमातीचा भाग
बने मेनाशे समुदाय देशातील कुकी जमातीचा एक भाग आहे. जरी बहुतेक कुकाRनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी बने मेनाशे समुदाय ज्यू धर्म आणि परंपरांचे पालन करतो. इस्रायलला जाण्याच्या तयारीने मणिपूरमधील अनेक लोक हिब्रू भाषा शिकत आहेत. इस्रायलला पोहोचल्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी औपचारिकपणे यहुदी धर्म स्वीकारावा लागेल. या समुदायाला इथे वसवल्याने देशाचा उत्तर आणि गॅलिली प्रदेश मजबूत होईल असे इस्रायली सरकारचे म्हणणे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.