पुण्यातील वारजे परिसरात शुक्रवारी संध्याकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने एका पोलिस कर्मचाऱ्याने पुढील अनर्थ टळला. याचं कारण की शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिन सुमारास ५ जणांच्या टोळक्याने वारजे भागात असलेल्या एका सलून च्या दुकानात जाऊन एका तरुणावर गोळीबार केला.
या घटनेत २ जणं जखमी झाले. गोळीबार सुरू असतानाच वारजे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून घटनास्थळी म्हणजेच गोळीबार सुरू असताना संबंधित पिस्तूल असलेल्या तरुणाला धरलं आणि त्याच्या ताब्यातील पिस्तूल काढून घेतलं. हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी वारजे परिसरातील चैतन्य चौक येथील एका सलूनमध्ये गोळीबाराची घटना घडली. या घटनेत निहाल शिंदे नावाचा तरुण हा केस कापत असताना त्याच्या डाव्या कानाला गोळी लागून जखमी झाला. तसेच सलूनमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान अमोल आढाव नावाच्या व्यक्तीला सुद्धा इजा झाली.
या घटनेत एकूण ५ आरोपींची ओळख पटली असून यातील साहिल राऊत याला वारजे पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वारजे पोलिस ठाण्यातील कर्मचारी त्या भागात पायी गस्त घालत असताना हा प्रकार घडला. २ दुचाकीवरून आलेल्या ५ जणांनी एकच सलून मध्ये प्रवेश केला. यातील एकाने त्याच्याकडील असलेल्या पिस्तुलातून शिंदेवर गोळीबार करायला सुरुवात केली.
त्याच परिसरातून पायी जात असलेल्या कर्मचाऱ्याने हे पाहिलं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला धरून ठेवलं. यातील इतर जणं घटनास्थळावरून पळून गेले मात्र या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला पकडून ठेवलं आणि त्याच्याकडील पिस्तूल जप्त केली आणि त्यानंतर इतर पोलिस कर्मचाऱ्यांना कळवलं. ही घटना निहाल शिंदे आणि आरोपी यांच्यातील पूर्वीच्या वैमनस्यातून घडली असून, जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या एका गुन्ह्याशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.