Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :- खाकीवर हात टाकण्याचे धाडस! कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना ३०-४० जणांनी घेरले; एमएसएफ जवानही जखमी

मुंबई :- खाकीवर हात टाकण्याचे धाडस! कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना ३०-४० जणांनी घेरले; एमएसएफ जवानही जखमी


घाटकोपर: मुंबईतील घाटकोपर परिसरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) जवानावर ३० ते ४० जणांच्या जमावाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस हवालदार कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​नेमकी घटना काय?

नित्यानंद नगर येथील हाजी मुल्ला चाळीत एका व्यक्तीने दोन मुलींसोबत अतिप्रसंग केल्याच्या रागातून मोठा जमाव जमला होता. या माहितीनंतर घाटकोपर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त जमावाने संशयितासह पोलिसांवरही हल्ला चढवला.

हेल्मेटने प्रहार आणि वाहनांची तोडफोड:
जमावाचा आवेश इतका होता की, त्यांनी पोलिसांच्या हातातील संशयिताला खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना बाजूला सारत एकाने पोलीस हवालदार कोळी यांच्या डोक्यात हेल्मेटने जोरदार प्रहार केला. तसेच एमएसएफ जवान खंदारे यांनाही लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, पोलिसांनी संशयिताला गाडीत बसवल्यानंतर जमावाने पोलीस वाहनावरही दगडफेक आणि हल्ला केला. ​याप्रकरणी आता घाटकोपर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पोलिसांवर हात उचलणाऱ्या दंगलखोरांचा शोध सुरू केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.