कोल्हापूर हादरले! १५ हून अधिक तरुणींना अश्लील व्हिडिओच्या जाळ्यात ओढणारा 'नराधम' जेरबंद; पुलाची शिरोलीत 'लव्ह जिहाद'चा संशय!
कोल्हापूर / पुलाची शिरोली: ज्या हातांत औषधांचे शास्त्र असायला हवे होते, त्या हातांनी वासनेचा नंगानाच घालत अनेक निष्पाप तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. शाहिद समीर सनदी या २२ वर्षीय नराधमाने सोशल मीडियाचा वापर करून तब्बल १५ पेक्षा अधिक तरुणींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढले.
त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून, त्यांना बदनामीची धमकी देत शिरोली आणि कोल्हापुरातील लॉजवर नेऊन त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले. हा केवळ एका विकृताचा गुन्हा नसून, यामागे एखादी 'संघटित टोळी' किंवा 'लव्ह जिहाद'चे मोठे कारस्थान असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संशयिताला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिकलेले विकृत: संशयित आरोपी फार्मसीचे शिक्षण घेत आहे.ब्लॅकमेलिंगचे अस्त्र: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणींचे मानसिक खच्चीकरण. शिरोली, हुपरी, हातकणंगले भागातील अनेक तरुणी या जाळ्यात अडकल्याची भीती. या घटनेच्या निषेधार्थ आज 'शिरोली बंद'ची हाक देण्यात आली असून, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध संघटनांनी या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवर करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास निर्भयपणे तक्रार द्यावी, तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, हीच संपूर्ण जिल्ह्याची भावना आहे!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.