सांगली महापालिकेत व्यापार क्षेत्राचा सन्मान! केदार खाडिलकर यांच्या निवडीने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सांगली रंग व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री. केदार खाडिलकर यांची महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल, असोसिएशनच्या वतीने त्यांचा २४ एप्रिल रोजी विशेष सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. अतुल शहा आणि विद्यमान अध्यक्ष श्री. हरीश लायकर यांच्या हस्ते श्री. खाडिलकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे सर्व सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना श्री. केदार खाडिलकर म्हणाले की, "नगरसेवक म्हणून काम करताना व्यापारी वर्गाच्या प्रलंबित समस्या मार्गी लावणे, हेच माझे प्रथम कर्तव्य असेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन." कार्यक्रमाच्या शेवटी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. महेंद्र तेजवाणी यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वांनी श्री. खाडिलकर यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.