Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिकमध्ये खळबळ: भोंदू खरातच्या 'मायाजाला'त बडे मासे? डॉक्टरांपाठोपाठ राजकीय जावई रडारवर!

नाशिकमध्ये खळबळ: भोंदू खरातच्या 'मायाजाला'त बडे मासे? डॉक्टरांपाठोपाठ राजकीय जावई रडारवर!


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून धक्कादायक बाबी समोर येत असून, महिलांना गर्भधारणा होऊ नये, यासाठी गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील दोन नामांकित डॉक्टरांची तपास यंत्रणेकडून चौकशी झाल्याची महिती समोर आहे. त्यापैकी एक डॉक्टर एका मोठ्या राजकीय नेत्याचा जावई असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटरर्स आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचीही चौकशी केली जाणार आहे. एसआयटी पथकाकडून खरात याची सलग चौकशी सुरू असून, त्यातून अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत.

तपासादरम्यान, खरातने महिलांशी वारंवार शारीरिक संबंध ठेवूनही कोणतीही महिला गर्भवती न झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तो काही औषधांचा वापर करत असल्याचा संशय बळावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महिलांना प्रसाद किंवा इतर माध्यमातून गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या औषधांचा पुरवठा एका डॉक्टरमार्फत होत असल्याचा संशय असून, संबंधित डॉक्टरची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच, महिलांना संमोहित करण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी काही औषधांचा वापर करण्यात आला का, याचाही तपास सुरू आहे.
पोलिसांकडून यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, खरात याच्या मोबाइलमधून मिळालेल्या डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सचीही सखोल छाननी सुरू आहे. त्यातून आर्थिक व्यवहार तसेच संपर्कातील व्यक्तींबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

पुरावे गोळा करण्यावर एसआयटीचा भर
खरात याची पोलिस कोठडी संपत आल्याने, न्यायालयात सादर करण्यापूर्वी जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर एसआयटीचा भर आहे. या तपासातून पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.