Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता महापालिकेत घुमणार 'जनसुराज्य'चा आवाज; स्वीकृतच्या माध्यमातून रणनीती स्पष्ट.

आता महापालिकेत घुमणार 'जनसुराज्य'चा आवाज; स्वीकृतच्या माध्यमातून रणनीती स्पष्ट.


सांगली : बर्‍याच राजकीय घडामोडीनंतर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदी भाजपच्या गटातून विश्‍वजित पाटील, केदार खाडिलकर, दरीबा बंडगर आणि डॉ. पंकज म्हेत्रे , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून स्नेहलताई सावंत, अशोक मासाळ तर काँग्रेसच्या गटातून अमित शहा समीर बिरनाळे या आठ सदस्यांची निवड शुक्रवारी महासभेत महापौर धीरज सुर्यवंशी यांनी जाहीर केली. सभागृहात एकही सदस्य नसताना जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा मिळाली असून स्वीकृतच्या माध्यमातून जनसुराज्यचा महापालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.
सदस्यसंख्येच्या दहा टक्के स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यासाठी आज महापौर सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेेखाली महासभा पार पडली.या सभेत गटनेत्यांनी आपल्या पक्षाकडून स्वीकृत निवडीसाठी योग्य उमेदवारांच्या नावाची यादी महापौरांना सादर केली.या नावाची घोषणा महापौरांनी महासभेत केली. यावेळी महापालिका आयुक्त संजीता महापात्रा, उपमहापौर गजानन मगदूम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वीकृत सदस्य होण्यासाठी ७३ इच्छुकांनी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले होते. यापैकी अटींची पूर्तता न केल्याने १६ प्रस्ताव प्रशासनाकडून अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये भाजपचे ५, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २, काँग्रेसचे ४ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे ५ अशा १६ नावावर फुली मारण्यात आल्याने उर्वरित ५७ जणांची यादी संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडे देण्यात आली. या नावातून भाजपसाठी चार आणि राष्ट्रवादी अजित पवार व काँग्रेस यांच्यासाठी प्रत्येकी दोन जागा उपलब्ध होत्या. या उपलब्ध जागासाठी गट नेत्यांकडून नावांची यादी बंद पाकिटातून महापौरांकडे देण्यात आली.यानंतरच या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपच्या कोट्यातून चार सदस्य निवडीची संधी होती. प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून भाजपचे ३ आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे एक अशी चार नावे देण्यात आली. यानुसार विश्‍वजित पाटील, दरिबा बंडगर आणि केदार खाडिलकर यांना संधी देण्यात आली. तर महायुतीचा घटक पक्ष म्हणून जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या शिफारशीने डॉ. पंकज म्हेत्रे यांना संधी मिळाली. तर माजी स्थायी सभापती पांडूरंग कोरे, अजिंक्य पाटील, शीतल लोंढे आदींची नाव या शर्यतीत मागे पडली.
तर राष्ट्रवादी काँग्र्रेस अजित पवार गटामध्येही स्वीकृत सदस्य निवडीवरून बरीच खडाजंगी झाल्याचे समजते. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिगंबर जाधव यांच्यासाठी आग्रह धरला होता, तर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनीही स्वीकृत साठी आग्रह धरला होता. अखेर श्री. मासाळ आणि श्रीमती सावंत यांची नावे निश्‍चित झाली तर काँग्रेसच्या गटातून आ. डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडून शहा व खासदार विशाल पाटील यांच्याकडून समीर बिरनाळे यांचे नाव निश्‍चित झाले. स्वीकृत सदस्य निवडीनंतर कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.