विधानपरिषद निवडणूक: अमोल मिटकरींना डावलणार? सुनेत्रा पवारांच्या 'मास्टरस्ट्रोक'मुळे नव्या नावांची चर्चा!
राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. 12 मे रोजी नऊ जागेसाठी मतदान होत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीमधील भाजपला पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे.
तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार असल्याने जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची जागा रिक्त होणार आहे. मात्र, या जागेवर मिटकरींना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या एका जागेसाठी राष्ट्रवादीमधील दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागा 17 मे रोजी रिक्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या नऊ जागेसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह नऊ जणांच्या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका जागेसाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची मुदत संपत असल्याने त्यांची जागा रिक्त होणार आहे. मात्र, या जागेवर मिटकरींना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. अजितदादांचे लाडके आमदार अशी त्यांची ओळख राहिली आहे.
मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) मिळतीजुळती भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर काही वरिष्ठ नेत्यांची नाराजी आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.दुसरीकडे या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या निवडणुकीत ऐन शेवटच्या क्षणी संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.त्यासोबतच माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी संघटनात्मक जबाबदरी सांभाळली आहे. त्याशिवाय पक्षाचे प्रवक्ते म्हणून प्रभावीपणे बाजू मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.त्याशिवाय मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील नेते व अजितदादांचे निकटवर्तीय सुरेशदाजी बिराजदार यांचे नाव चर्चत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या धाराशिव लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना माघार घेत असताना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द अजितदादांनी दिली होता. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा ही सध्या जोरात सुरु आहे. या चर्चेत असेलल्या तीन नावापैकी या पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा जोरात सुरु आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यादाच विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या जागेवर संधी देत असताना त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. सध्या पक्षाकडे विधान परिषदेच्या एका जागेसाठी नेत्यांची रांग लागली असली तरी त्यापैकी एकाची निवड करायची आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.