Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: वेतनवाढीच्या प्रक्रियेला वेग, केंद्र सरकारकडून कडक निर्देश"

​"बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: वेतनवाढीच्या प्रक्रियेला वेग, केंद्र सरकारकडून कडक निर्देश"


देशातील सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारने बँकांना पगारवाढीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सरकारी बँक कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळणार आहे.

याबाबत सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील पगार वाढीच्या प्रक्रियेत कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही. यासाठी तेराव्या द्विपक्षीय करारावर शक्य तितक्या लवकर वाटाघाटी सुरू करून तो केवळ एका वर्षात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एक नोव्हेंबर 2017 पासून लागू होणारे नवीन वेतन श्रेणी कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेवर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.
अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील वित्तीय सेवा विभागाने याबाबत 20 एप्रिल रोजी सर्व सार्वजनिक बँकातील प्रमुखांना हा निर्देश जाहीर केला. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा मार्ग सोपा झाला आहे. दरम्यान मागील वेतन करारांच्या वेळी असं दिसून आलं होतं की, मुख्य तोडगा निघाला तरी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यासाठी बराच वेळ लागत होता. याचा थेट फटका बँक कर्मचाऱ्यांना बसत होता. मात्र आता सरकारने बारा महिन्यात ही पगार वाढ देण्याचं निर्देश दिल्याने बँक कर्मचाऱ्यांना लवकरच पगार वाढ मिळणार आहे.
दर पाच वर्षांनी होणाऱ्या या वेतन सुधारणे जागेवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार नाही. तर सर्वच बँकिंग क्षेत्राच्या मोठ्या भागावर सकारात्मक परिमाण होईल परिणाम होईल. कारण यामध्ये अनेक जुन्या खाजगी बँका आणि काही परदेशी बँक कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.