Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाढदिवस सेवाकार्याचा: सांगलीत सुधीर दादांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वदेशी फार्मा' आणि 'भाजप जैन प्रकोष्ट'चा अनोखा औषधतुला उपक्रम.

वाढदिवस सेवाकार्याचा: सांगलीत सुधीर दादांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वदेशी फार्मा' आणि 'भाजप जैन प्रकोष्ट'चा अनोखा औषधतुला उपक्रम.


सांगली : समाजाभिमुख उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वदेशी फार्मासिटिकल सांगली व भाजप जैन प्रकोष्ठ यांच्या वतीने औषधतुला उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमातून जमा झालेली औषधे माननीय आमदार गाडगीळ यांच्या इच्छेनुसार सांगली येथील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांना मोफत वाटपासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. प्रकाश गुरव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारे, डॉ. रुपेश शिंदे, डॉ. दळवी ,समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय विभाग प्रमुख श्री संजय खाडे प्रशासकीय अधिकारी श्री.भोरे, मेट्रन मॅडम तसेच  स्वदेशी उद्योग समूहाचे संचालक श्री हर्षद पाटील, विपुल पाटील उपस्थित होते. याशिवाय स्वदेशी उद्योग समूहाचे कर्मचारी व सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.