Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"डोकं ठिकाण्यावर आहे का?" पडळकरांच्या 'त्या' आरोपावर विश्वजीत कदम संतापले; दिला सडेतोड इशारा

​"डोकं ठिकाण्यावर आहे का?" पडळकरांच्या 'त्या' आरोपावर विश्वजीत कदम संतापले; दिला सडेतोड इशारा


सांगली : लोकसभा तिकीट विकून विश्वजित कदम आणि जयंत पाटलांनी इव्हेन्ट केला, या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या आरोपाला काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी प्रत्युत्तर दिले. पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेव्हलचे नेते आहेत, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यावर तिकीट विकून 'इव्हेंट' केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी अतिशय वेगळ्या आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे, ज्याची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. आज पलूस तालुक्यातील नागठाणे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार विश्वजीत कदम आले होते.


विश्वजीत कदम यांच्याकडून पलटवार
यावेळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले. यावर कोणतीही संतप्त प्रतिक्रिया न देता, विश्वजीत कदम यांनी दोन्ही हात जोडूला आणि चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य आणत पडळकरांना टोला लगावला. "पडळकर हे खूप महान नेते आहेत. ते थेट 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे नेते आहेत. आम्ही भारतात आणि महाराष्ट्रात राहणारे छोटे लोक आहोत, त्यामुळे त्यांच्या लेव्हलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही." असे हसत हसत विश्वजीत कदम म्हणाले.

एकीकडे पडळकर यांनी "माझ्या भीतीपोटी हे तिघे (जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटील) एकत्र आले आहेत आणि यांना जास्तीचे ज्ञान नाही अशी बोचरी टीका केली असताना, विश्वजीत कदम यांनी मात्र दोन्ही हात जोडून आणि पडळकरांना थेट अमेरिकेच्या अध्यक्षांची उपमा देऊन हा विषय पूर्णपणे हसण्यावारी नेला आहे.
पडळकर काय म्हणाले होते?

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. दोघा नेत्यांनी विशाल पाटील यांचे काँग्रेसचे तिकीट ठरवून कापले आणि सांगली लोकसभेचे तिकीट विकून एक प्रकारे 'इव्हेंट' केला, असा आरोप पडळकर यांनी केला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.