Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्र्याला महिलेने झापलं; नाना पटोलेंनी टोमणे मारत उडवली थट्टा!

मंत्र्याला महिलेने झापलं; नाना पटोलेंनी टोमणे मारत उडवली थट्टा!


मुंबई : नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी केलेल्या विरोधाप्रकरणी भाजपने मंगळवारी (21 एप्रिल) वरळीतील जांबोरी मैदान ते NSCI डोम अशी 'जन-आक्रोश महिला पदयात्रा' काढली.

मात्र याच यात्रेवेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांवर संताप व्यक्त केला. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

महिला आरक्षणासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. अशा विधानावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी, असे मला वाटत नाही. कारण खोटे बोलणाऱ्यालाच ते लागते. महिला विधेयकाविषयी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. कारण सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्यास तुम्हाला कुणी रोखले होते? जर आज महिला आरक्षण विधेयक लागू झाले असते तर सभागृहात 181 महिला पाहायला मिळाल्या असत्या, असे म्हणत नाना पटोले यांनी जातनिहाय जनगणनेवरही भाष्य केले. 
नाना पटोले म्हणाले की, सरकारने प्रथम सांगितले की, आम्ही जातनिहाय जनगणना करू. पण आता ते सांगत आहेत की, प्रथम आम्ही घरांची गणना करू. तुमच्याकडे महापालिका, नगरपंचायत, पंचायती आणि ग्राम पंचायत अशा ठिकाणी सर्व रेकॉर्ड आहेत. त्यामुळे खोटे कोण बोलत आहे? खरं तर बहुजनांवर सातत्याने अन्याय करणारी मानसिकता आज सत्तेत आहे. ही सत्तेतील मानसिकता बहुजनांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या खोटारड्या लोकांना जनतेने आता ओळखले आहे. भाजपला लोक आज कंटाळले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

नना पटोले यांनी गिरीश महाजन यांची उडवली खिल्ली
गिरीश महाजन यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील महिलेचा संताप हा भाजपच्या सत्तेच्या माजाचा परिणाम आहे. आमची सत्ता आहे आणि या सत्तेचा दुरुपयोग ज्या पद्धतीने जनतेला त्रास देण्यासाठी केला जात आहे, याचे सर्वात मोठे उदाहरण काल फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून दिसून आले. सामान्य लोकांनी त्यांना कसे ट्रोल केले. एक महिलाच त्यांना शिव्या घालत होती. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या असतील, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.