नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. लैंगिक अत्याचारासह अनेकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर राखलं आहे. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
खरं तर, अशोक खरातला अटक झाल्यानंतर ३१ मार्चपासून कल्पना खरात फरार आहे. नाशिक पोलीस तिचा सर्वत्र शोध घेत आहेत. मात्र तिचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, कल्पना खरातकडून अटकपूर्व जामिनासाठी राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. कल्पना खरातच्या बाजुने कोर्टात वकील प्रशांत गिरी उपस्थित होते. त्यांनी कल्पना खरातची भूमिका मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले.
पती अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत मला माहीत नाही. माझ्या पतीने गंभीर गुन्हे केलेत, अशी कल्पना खरातची भूमिका असल्याचं वकिलांनी कोर्टात संगितलं. वकिलांचा युक्तीवाद कोर्टाने ऐकला असून सायंकाळी पाच वाजता कोर्ट याबाबत निर्णय देणार आहे. अशोक खरातच्या विविध गुन्ह्यात कल्पना खरातची साथ होती. तिच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले. तसेच तिच्या नावे खरातची संपत्ती देखील असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी कल्पना खरातची बाजू मांडताना अशोक खरात प्रकरणात कल्पना खरातचा कसलाही सहभाग नसल्याचा दावा केला. कल्पना खरातचे सर्व बँक खाते पती अशोक खरात ऑपरेट करायचा, असा युक्तीवाद गिरी यांनी केला. वकिलांचा युक्तीवाद कोर्टाने ऐकला असून आपला निर्णय राखून ठेवला आहे. सायंकाळी पाच वाजता यावर कोर्ट निर्णय देणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.