Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनिष्ठेचा आधारस्तंभ हरपला: वसंतदादांचे मानसपुत्र यशवंतराव हाप्पे यांचे निधन​

एकनिष्ठेचा आधारस्तंभ हरपला: वसंतदादांचे मानसपुत्र यशवंतराव हाप्पे यांचे निधन


मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील एक विश्वासू व्यक्तिमत्व, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक आणि मानसपुत्र श्री. यशवंतराव रामचंद्र हाप्पे यांचे आज पहाटे १:२० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. कारिवडे - सिमालवाडी गावाचे सुपुत्र असलेल्या हाप्पे साहेबांच्या जाण्याने एका निस्पृह आणि निष्ठावान पर्वाचा अंत झाला आहे.

​यशवंतराव हाप्पे यांनी वसंतदादांच्या सावलीसारखे राहून अनेक दशकं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
​पत्ता: B-102, दीप्ती सॅफायर CHS, नटवर नगर रोड क्र. ३, इस्माईल युसुफ कॉलेज ग्राउंड जवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई – ४०००६०. 

​​वेळ: आज सायंकाळी ४:३० वाजता.
​स्थळ: जोगेश्वरी स्मशानभूमी.
​"साहेबांच्या शब्दाला मान देणारा आणि शेवटपर्यंत दादांच्या विचारांशी प्रामाणिक राहणारा एक सात्विक माणूस आज आपल्यातून निघून गेला."
सांगली दर्पण परिवार कडून ​भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.